Horoscope today , 3 November : आज ३ नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी रात्री १० वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. रविवारी दुपारी ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत शुभयोग राहील. त्यानंतर आता अनुराधा नक्षत्र जागृत असेल. याशिवाय आज विश्वकर्मा पूजा करण्यात येणार आहे. असं म्हटलं जातं की, भगवान विश्वकर्मा यांची पूजा केल्याने व्यक्तीतील कला विकसित होते. ज्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळतं. आजच्या दिवशी भगवान विश्वकर्माच्या पूजेबरोबरच साधनं, यंत्र, वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखील पूजा केली जाते.

त्याचप्रमाणे आज दिवाळीच्या सणांमधील सगळ्यात महत्त्वाचा, भावा-बहिणीचा आवडता सण म्हणजे भाऊबीज असणार आहे.या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून, त्याचे औक्षण करून, त्याला दीर्घायुष्य मिळावे आणि त्याचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटवस्तू देतात. तर आजचा खास दिवस मेष ते मीनसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

३ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल. महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका.

वृषभ:- मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

मिथुन:- मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल. त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल. विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ति बरोबर फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील.

कर्क:- आईचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल.

सिंह:- काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल. तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.

कन्या:- एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. घरातील लोकांबरोबर फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.

तूळ:- तुमच्यातील सर्जनशीलता वाढीस लागेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक:- आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्‍यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी.

धनू:- आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.

मकर:- कामात अति घाई करू नका. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.

कुंभ:- जुनी कामे तडीस जातील. दानधर्म करता येईल. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

मीन:- गूढ शास्त्रात रस घ्याल. उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल. पोटाच्या तक्रारी संभवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )