Bhaubeej 2025: हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या वर्षी भाऊबीज गुरूवार, २३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते, औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करते. परंतु भावाला ओवाळताना काही विशेष गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

कोणत्या दिशेला तोंड करून औक्षण करावे?

भावाचे औक्षण करताना त्याचा चेहरा उत्तर किंवा पूर्वेला असावा याची काळजी घ्यावी.

भावाला औक्षण कसे करावे?

  • भाऊबीजेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाचे औक्षण करावे. त्यावेळी पूजेच्या ताटामध्ये कुंकू, अक्षता, चंदन आणि धूप-दीप, मिठाई ठेवावी.
  • भावाला टिळक लावताना “भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिमं शुभं, प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः” हा मंत्र वाचावा आणि भावाच्या दिर्घायुष्यासाठी कामना करावी.

भाऊबीज शुभ मुहूर्त

भाऊबीजचा शुभ मुहूर्त २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १:१३ ते ३:२८ पर्यंत असेल.

भाऊबीजेची पौराणिक कथा

भाऊबीजची पौराणिक कथा यमराज आणि यमुनाशी जोडलेली आहे. कथेनुसार, एकदा यमुनेने तिचा भाऊ यमराजला तिच्या घरी बोलावले. यमराजजींनी हे आमंत्रण स्वीकारले. जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला. भावाला निरोप देताना, यमुनेने त्याला नारळ भेट दिला. यमराजांनी याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली की, हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील. यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा आहे.