Budh Gochar 2025 In Vrishabh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला वाणी, व्यवसाय, संवाद, शेअर बाजार, बँकिंग आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानले जाते. तसेच तो ग्रहांचा राजकुमार मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाच्या स्थिती बदलाला विशेष महत्त्व असते. ग्रहांचा राजकुमार बुध २३ मे रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे, त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. त्यांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. पण, कोणत्या राशींना बुध गोचरचा लाभ होणार आहे जाणून घेऊ…
वृषभ (Taurus)
बुध ग्रहाचे गोचर वृषभ राशीसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते योग्यच ठरू शकतात. नोकरीत पदोन्नती आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता आहे, यामुळे तुमचा आनंद वाढेल आणि तुमच्या कारकिर्दीत प्रचंड वाढ होऊ शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
बुध ग्रहाचा राशी बदल कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष फायदे मिळू शकतात. पैसे कमविण्याच्या अनेक चांगल्या संधी चालून येतील. जुन्या गुंतवणुकीतून नफा होईल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देशात आणि परदेशातही प्रवास करू शकता. जर तुम्ही कोणत्याही सर्जनशील कामात सहभागी असाल तर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल मिळू शकतात.
कुंभ (Aquarius)
बुध ग्रहाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुखं मिळू शकतात. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला यशही मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. यावेळी तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी व्हाल.