Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला, वाणी, तर्क वितर्क, व्यवसाय, बौद्धिक क्षमता, शिक्षण, बुद्धी आणि धन संपत्तीचा कारक मानले जाते. बुध ग्रहाचा गोचर लोकांची आर्थिक स्थिती, बुद्धी -वाणी इत्यादीवर परिणाम करतात. २२ जून रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे आणि ३० ऑगस्टपर्यंत कर्क राशीमध्ये विराजमान राहणार आहे. जाणून घेऊ या कोणत्या राशींसाठी बुध गोचर फायदेशीर ठरणार आहे.

मेष राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध गोचर लाभदायक ठरणार आहे. या लोकांना जुन्या समस्यांपासून दिलासा मिळू शकते. ज्या लोकांच्या आईचे आरोग्य चांगले नाही, त्यांना आराम मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणामध्ये यश मिळेन. या लोकांची धनसंपत्ती वाढणार. यांना भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध गोचर नोकरीमध्ये प्रमोशन आणि पगारात वाढ होण्याचे योग निर्माण करत आहे. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. यांचा बँक बॅलेन्स वाढणार. या लोकांचे आयुष्य बदलू शकते.

कन्या राशी

कन्‍या राशीच्या लोकांसाठी व्यवसायात लाभ होण्याचे योग निर्माण करत आहे. हे लोक स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतात. संपत्ती संबंधी प्रकरणात यश मिळू शकते. या लोकांची इतर लोक खूप प्रशंसा मिळेल.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी बुध गोचर फायद्याचा ठरू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले काम वेगाने पूर्ण होऊ शकते. मेहनतीचे फळ मिळू शकते. धनलाभाचे योग जुळून येईल. समाजात पद प्रतिष्ठा मिळू शकते. हे लोक चांगले काम करतील आणि या लोकांचे खूप कौतुक सुद्धा होणार.

कुंभ र‍ाशी

कुंभ राशीसाठी बुध गोचर धन प्राप्तीचे योग निर्माण करेन. अडकलेले पैसे या लोकांना परत मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायासाठी हा वेळ चांगला राहीन. वाणीच्या जोरावर हे लोक चांगले काम करतील. त्यांना भरपूर यश मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)