धनसंपत्ती, व्यवसाय, वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा हा राजकुमार मार्च महिन्यात महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजचे ७ मार्चला बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसचं याच दिवशी शुक्र कुंभ राशीत गोचर करणार आहे. बुधदेवाचे गोचर होतात बुध आणि राहूची युती होणार आहे. महाशिवरात्रीच्या आधी होणारे शुक्र आणि बुधदेवाचे राशीपरिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरु शकते. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात, व्यवसायात नफा कमविण्याची संधी मिळू शकते. जाणून घेऊया नेमका कोणत्या राशींना बुधाच्या स्थान बदलाचा फायदा होऊ शकतो.

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मिथुन राशी

बुध आणि शुक्राचे गोचर मिथुन राशीसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारी ठरु शकते. शैक्षणिक स्पर्धेशी संबंधित लोकांना यश मिळू शकते. व्यावसायिक लोक आपल्या कामाचा यशस्वी विस्तार करू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कोणतंही काम कराल त्यात तुम्हाला पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभू शकते. तुमचा सामाजिक प्रभाव वाढू शकतो. नवविवाहितांना काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. 

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

(हे ही वाचा : येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?)

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राचे गोचर फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकेल, ज्याच्या मदतीने व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होऊ शकते. याशिवाय जे लोक परदेशात नोकरीसाठी जाण्यास इच्छुक आहेत त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

कन्या राशी

बुध आणि शुक्राचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पैसा आणि सन्मानही मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)