15 September Budh Gochar: वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाला बुद्धी, विचार,संवाद, गणित, चतुराई आणि मित्र यांचा कारक मानले जाते. बुध ग्रह कन्या राशीत उच्‍च मानले जातात. १५ सप्टेंबरला बुध ग्रह आपल्या उच्‍च राशीत म्हणजे कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या भावात जातील. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात प्रगती मिळू शकते. व्यावसायिक गोष्टींवर तुमचे जास्त लक्ष राहील आणि त्यामुळे अधिक नफा मिळू शकतो तसेच नवीन व्यवसायाची सुरुवातही होऊ शकते. या वेळेत व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात ज्याचा पुढे फायदा होईल. नवीन नोकरीची संधी किंवा बढती मिळू शकते. प्रवास फायद्याचे ठरतील आणि व्यवसायात नफा वाढेल. तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहाल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी बुध ग्रहाचा गोचर चांगला ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून भौतिक सुखाच्या भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. पितृसंपत्तीचा लाभही मिळू शकतो. करिअरच्या दृष्टीने पाहिले तर या काळात प्रगती होईल आणि पगारवाढीची शक्यता आहे. नोकरीत बढती किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू होऊ शकतात. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची संधी मिळू शकते. तसेच आई आणि सासरच्या लोकांशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

बुध ग्रहाचा गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून लग्न भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय व्हाल आणि मान-सन्मान मिळेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जर तुम्ही बँकिंग, मार्केटिंग किंवा मीडियासारख्या क्षेत्रात असाल तर तुमच्या बोलण्यामुळे व्यवहार यशस्वी होतील. घरात आनंद वाढेल आणि कुटुंबासोबत छान वेळ जाईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)