Mercury Transit Negative Impact Zodiac Signs: बुध ग्रहाचं गोचर वृश्चिक राशीत २४ ऑक्टोबर, शुक्रवारच्या दिवशी झालं आहे. बुध ग्रहाने काल दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. तो या राशीत साधारण एक महिना राहील, म्हणजे २३ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत बुध वृश्चिक राशीत असेल. त्यानंतर तो धनु राशीत प्रवेश करेल.
बुधाचं हे राशी बदल सर्व १२ राशींवर परिणाम करणार आहे, पण ३ राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल. या राशींवर बुधाचा गोचर अशुभ परिणाम देऊ शकतो. त्यामुळे वादविवाद, भांडण, तब्येतीच्या समस्या आणि शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. चला पाहूया बुध गोचरामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वृश्चिक राशीत बुध गोचराचा राशींवर होणारा नकारात्मक परिणाम (Budh Gochar on 24 October Negative Impact Horoscope)
मिथुन राशी (Gemini Horoscope)
बुध गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांनी एक महिना सावध राहणे गरजेचे आहे. बुधाचं गोचर मिथुन राशीच्या सहाव्या भावात झालं आहे, जो तुमच्या काम आणि तब्येतीवर वाईट परिणाम करू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे, विशेषतः कामाच्या ठिकाणी. नाहीतर नुकसान होऊ शकते. सहकाऱ्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा आणि नम्रपणे बोला. या एका महिन्यात तब्येतीचीही काळजी घ्या, नाहीतर आजारी पडू शकता.
सिंह राशी (Leo Horoscope)
बुधाचं गोचर सिंह राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात वादविवाद आणि तणाव आणू शकतो. बुधाचं गोचर सिंह राशीच्या चौथ्या भावात झालं आहे, जो घर, कुटुंब आणि कौटुंबिक बाबींशी संबंधित असतो.
या गोचरामुळे सिंह राशीच्या लोकांच्या घरात मतभेद किंवा वाद होऊ शकतात. कुटुंबातील लोकांचे बोलणे शांतपणे आणि संयमाने ऐका. इतरांशी बोलताना आपले विचार शांतपणे मांडावेत. मतभेद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवा. या काळात आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, कारण एखादी जुनी तब्येतीची समस्या पुन्हा उद्भवू शकते.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
बुधाचं गोचर धनु राशीच्या लोकांसाठी सावध राहण्याचा संकेत देतो. या एका महिन्यात तुम्ही तुमच्या शत्रूंंपासून सावध राहा, तसेच जे लोक समोरून मित्रासारखे वागतात पण मागून विरोध करतात, त्यांच्यापासूनही जपून राहा.
बुधाचं गोचर धनु राशीच्या बाराव्या भावात झालं आहे. हा भाव खर्च, परदेश आणि अध्यात्माशी संबंधित मानला जातो. या काळात अनावश्यक खर्च टाळा, नाहीतर आर्थिक अडचण येऊ शकते. गुप्त शत्रूंमुळे काही त्रास होऊ शकतो. आपल्या कामकाज आणि वागणुकीचा विचार करा, त्यामुळे तुम्हाला नवीन मार्ग किंवा संधी मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
