Budh Margi 18 January 2023 Shani And Mercury Transit Will Give These Lucky Zodiac Sign Huge Money Ma Lakshmi blessing | Loksatta

१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी

Mercury Margi in 2023: १७ जानेवारीला कुंभ राशीत शनि प्रवेश घेणार आहे, यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुध मार्गी झाल्याने तीन राशींसाठी प्रचंड धनलाभाचे योग आहेत.

१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी
१८ जानेवारी २०२३ पासून 'या' राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mercury Margi in 2023: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा धन, बुद्धी, व्यापार व संवाद कौशल्याचा कारक मानला जातो. जेव्हा बुध ग्रह मार्गी होतो तेव्हा घटकांमध्ये प्रभाव दिसून येतो. येत्या नववर्षात म्हणजेच १८ जानेवारी २०२३ ला बुध ग्रह मार्गी होणार आहे. या मार्गक्रमणाचा प्रभाव राशिचक्रावरही दिसून येईल. बुध मार्गी होताच काही राशींच्या कुंडलीत भाग्योदयाचे तर काहींना नुकसानाचे योग आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार, तीन अशा राशी सुद्धा आहेत ज्यांना बुध ग्रह सोन्याहून पिवळ्या यशप्राप्तीच्या संधी देणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे जाणून घेऊयात…

(Mercury Margi 2023) सिंह

सिंह राशीसाठी बुध मार्गी होताच प्रचंड धनलाभाचा योग तयार होत आहे. बुध ग्रह आपल्या राशीत पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान प्रेम संबंध व संतती प्राप्तीशी संबंधित असतात. येत्या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना संततीप्राप्तीचे योग आहेत. आयुष्यातील नवा पाहुणा येताना लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन येऊ शकतो. तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा येता काळ हा लाभदायक ठरणार आहे. आपल्याला परदेश वारीचे योग आहेत. तुमच्या जोडीदारासह मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र तुम्हाला भांडणातून बाहेर पडताच तुमच्या प्रेमाची जाणीव होईल.

(Budh Margi 2023) कन्या

बुध ग्रहाचे मार्गीक्रमण होताच कन्या राशीसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. कन्या राशीच्या कुंडलीत बुध ग्रह चौथ्या स्थानी विराजमान होणार आहे. हे स्थान भौतिक सुखाशी संबंधित आहे. येत्या काळात तुम्हाला नव्या घरात प्रवेशाचे किंवा नवीन वाहन खरेदीची संधी मिळू शकते. तुमच्या आईसह तुमचे संबंध आणखी मजबूत होण्याची संधी तुम्हाला बुध ग्रह येणार आहे. कुटुंबासह किंवा मित्र परिवारसह एखादी छान ट्रिप होऊ शकते.

हे ही वाचा<< २९ डिसेंबरपासून ‘या’ ३ राशी होऊ शकतात श्रीमंत; शनिच्या राशीत प्रवेश करून शुक्र देणार अपार धनलाभाची संधी

(Shani and Mercury Transit 2023) कुंभ

कुंभ ही शनिची आवडती रास आहे. मुख्य म्हणजे १७ जानेवारीला कुंभ राशीत शनि प्रवेश घेणार आहे, यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कुंभ राशीत बुध मार्गी होऊन ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान धनलाभाशी संबंधित आहे. या काळात कुंभ राशीच्या मंडळींना धनप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. नवनवीन मार्गातून तुमची आर्थिक कमाई वाढू शकते. आपल्याला नशिबाची साथ लाभणार आहे परिणामी मागील वर्षभरात केलेली संपूर्ण मेहनत खर्या अर्थाने फळास येऊ शकते.

(टीप: वरील माहिती ही गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:45 IST
Next Story
Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ६ डिसेंबर २०२२