Budh Margi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. बुध ग्रह दर १५ दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याव्यतिरिक्त बुध ग्रह वक्री, मार्गी आणि उदीत अवस्थेत प्रवेशही करतो. सध्या बुध मीन राशीत वक्री चाल चालत आहे. परंतु येत्या ६ एप्रिल रोजी बुध याच राशीत मार्गी होणार आहे. बुधाच्या या स्थितीने १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम अनुभवता येतील.

पंचांगानुसार, ६ एप्रिल रोजी सकाळी ०५ वाजून ०४ मिनिटांनी मार्गी अवस्थेत जाणार आहे.

बुधाची मार्गी अवस्था भाग्य चमकवणार

वृषभ

वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होईल. आरोग्यसमस्यादेखील दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. व्यापारात वाढ होईल. सराकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांना यश मिळेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाची मार्गी अवस्था अत्यंत सकारात्मक फळ देणारी ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)