Budh Planet Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रहांच्या राशी बदलाचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. अशातच येत्या जून महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा मिथुन राशीत उदय होणार आहे. बुध हा सर्वांत लहान ग्रह मानला जातो. त्याशिवाय मिथुन आणि कन्या या राशींवर बुध ग्रहाचे वर्चस्व असते. तसेच तो व्यवसाय आणि बुद्धीचा दाता मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचा राशिबदल होतो. तेव्हा तेव्हा मानवी जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो.
त्यात जूनमध्ये बुध ग्रहाचा मिथुन राशीत उदय होणार असल्यामुळे त्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण, अशा तीन राशी भाग्यशाली राशी असतील; ज्यांचा बुध गोचरामुळे सुवर्णकाळ सुरू होईल. तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. तसेच नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ या ३ भाग्यशाली राशींविषयी….
मिथुन
बुधाचा उदय मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या नियोजित कामे व योजना यशस्वी होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. त्यासह कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला प्रेम आणि सहकार्य लाभेल. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
कन्या
बुधदेवाच्या मिथुन राशीतील उदयामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती करता येईल. त्याशिवाय तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. या काळात नोकरदारांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. तसेच व्यापारी वर्गाला चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.
तुळ
बुधाचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात नशिबाची तुम्हाला साथ मिळू शकते. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. यावेळी तुम्हाला देश-विदेशांत फिरण्याची संधी मिळू शकते. तसेच या काळात नशिबाने साथ दिली, तर तुमचे अपूर्ण काम पूर्ण होऊन आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार लोकांना इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेत चांगले यश मिळू शकते.