Budh Vakri In November 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तनासह एका निश्चित कालावधीनंतर वक्री किंवा मार्गी अवस्थेतही जातात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे.पंचांगानुसार, बुध ग्रह १० नोव्हेंबर रात्री १२ वाजून ३१ मिनिटांनी वक्री होणार असून २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत तो या अवस्थेत राहील. बुधाची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होणार आहे.
‘या’ तीन राशींना बुध देणार सुख-समृद्धी
तूळ (Tula Rashi)
बुधाची वक्री चाल तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन (Mithun Rashi)
बुधाची वक्री चाल मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
कर्क (kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाची वक्री चाल अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)