Chanakya Niti for husband-wife relationship:  आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. ते एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात अनेक ग्रंथ लिहिले आणि आजही लोकांना चाणक्य नीति वाचायला आवडते. चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र पुस्तकात जीवनातील प्रत्येक पैलूबद्दल लिहिले आहे. चाणक्य नीतीने पती-पत्नीच्या नात्याबाबत महत्त्वाची तत्त्वे दिली आहेत. पती-पत्नीचे नाते हे सर्वांत पवित्र नाते मानले जाते. आनंदी जीवनासाठी पती-पत्नीच्या नात्यातील गोडवाही तितकाच महत्त्वाचा असतो. पती-पत्नीच्या नात्यात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी चाणक्याने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

१. पती आणि पत्नी दरम्यान सुसंवाद

चाणक्य नीतिनुसार, ज्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन तणाव, दुःख आणि अडचणींनी भरलेले असते, मग तो कितीही प्रतिभावान किंवा प्रभावशाली असला तरीही, त्याच्या आयुष्यात नेहमीच निराशा आणि दुःख असते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये समन्वय आवश्यक असतो. कोणत्याही नात्यात भांडण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे परस्पर समंजसपणाचा अभाव. अशा परिस्थितीत वैवाहिक नात्यात पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ आवश्यक असतो.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

(हे ही वाचा : Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांचे ‘हे’ शब्द तुमच्याकडे नोट करुन ठेवा; नेहमी राहाल पुढे )

२. नात्यात विश्वास असायला हवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, सुखी वैवाहिक जीवन हे भेटवस्तूसारखे असते. वैवाहिक जीवन जितके आनंदी असेल तितके जीवनातील समस्या कमी होतील. विश्वासामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनी एकमेकांच्या भावनांचा पूर्ण आदर केला पाहिजे. दोघांपैकी कोणीही आपल्या जोडीदाराचा आदर करत नसेल तर लवकरच नाते तुटते. विश्वासाचे बंधन जितके मजबूत असेल तितके तुमचे नाते अधिक मजबूत होईल आणि तुम्ही दोघेही आनंदी व्हाल. 

३. तुमचे प्रेम कमी पडू देऊ नका

चाणक्य नीतीनुसार, प्रेम ही कोणत्याही नात्याची पहिली अट असते. पती-पत्नीचे नाते हे सर्वात पवित्र नाते मानले जाते. या नात्यात खोटेपणा आणि दिखावाला थारा नाही. त्यामुळे हे टाळावे. या नात्यात जितका प्रामाणिकपणा असेल तितके पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होईल.

(टीप: इथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)