आजकाल प्रत्येकालाच यशस्वी व्यक्ती बनायचे असते. यासाठी काही लोक खरोखरच खूप मेहनत घेतात. तर काही जण यामध्ये शॉर्टकट मारतात. जे कठोर परिश्रम करतात आणि सत्याच्या मार्गावर चालतात ते एक दिवस नक्कीच यशस्वी होतात. याउलट जे वाईट कृत्ये करतात, चुकीच्या मार्गाने श्रीमंत होतात त्यांच्याकडे पैसा जास्त काळ टिकत नाही. यशप्राप्तीचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. पण कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी विशेषत: करिअरमध्ये यशप्राप्तीसाठी आपण दैनंदिन जीवनात काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल तर चाणक्याच्या या तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
योग्य संगत निवडा
आचार्य चाणक्य म्हणतात की, वाईट कर्म करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. जर तुम्ही वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या संगतीत असाल तर तुम्हीही एक दिवस वाईट व्हाल. संताचा सहवास माणसामध्ये सात्त्विक विचारधारा रुजवतो. दुसरीकडे चुकीच्या लोकांच्या संगतीने माणूस वाईट होतो. यासाठी वाईट लोकांपासून दूर राहा. वाईट लोकांसोबत राहिल्याने ते जे करतात त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. विनाकारण एखाद्याचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.
आपल्या सवयी बदला
तुम्हीआचार्य चाणक्य मानत असाल तर, नेहमी चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्या. श्रीमंत होण्याची इच्छा सगळ्यांची असते. पण श्रीमंत होणे सगळ्यांनाच जमते असे नाही. कारण खरेच श्रीमंत होणे हे दिसते तेवढे सोपे नक्कीच नाही. तसे असते तर सगळेच जण सहज श्रीमंत झाले असते. तुम्हाला आयुष्यात यश मिळेल की अपयश हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते. त्यामुळे सर्वात आधी आपल्या सवयींमध्ये बदल केले पाहिजेत.
हेही वाचा – ‘या’ तारखेला जन्मलेले लोक होतात कोट्यधीश? नोकरी-व्यवसायात मिळवू शकतात घवघवीत यश
मेहनतीला पर्याय नाही
अनेक जण नशिबाच्या भरवशावर बसून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतात. तुम्हीसुद्धा मी कधी तरी श्रीमंत होईन. माझ्या आयुष्यात तो क्षण येईल, अशी वाट बघत बसाल तर तुम्हाला श्रीमंतीची केवळ स्वप्नेच पाहावी लागतील. त्या पेक्षा असल्या भ्रामक समजुतींमधून बाहेर या आणि मेहनत करा. कारण मेहनतीला पर्याय नसतो.