आयुष्यात चढ-उतार येणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी आपण स्वतःही त्याला जबाबदार असतो. आपली चांगली आणि वाईट कृती आपल्याला यश आणि अपयश देतात. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले आहे, जे आपल्याला वाईट काळात घेऊन जातात. या गोष्टींचा अवलंब केल्यास व्यक्ती आपल्या जीवनातील अनेक दुःखे आणि संकटे सहज टाळू शकतात.

या गोष्टी तुम्हाला वाईट काळापासून वाचवतील
मूर्ख व्यक्तीपासून अंतर ठेवा : चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की, मूर्ख लोकांपासून नेहमी दूर राहा. मूर्खाला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे या दोन्ही गोष्टी तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी पुरेशा आहेत. ते तुमचा वेळ देखील वाया घालवतील आणि तुम्हाला अनावश्यक त्रासात अडकवतील.

आणखी वाचा : Chanakya Niti: या स्थितीत पत्नी आणि पैशांना जास्त महत्त्व देऊ नका! अन्यथा आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट गमावाल!

गरिबांना दान करा: तुमच्या उत्पन्नाचा काही भाग गरिबांना दान करा. आचार्य चाणक्य म्हणतात की, गरजूंना मदत केल्याने तुम्हाला पुण्याही लाभेल. यासोबतच समाजाप्रती असलेली तुमची जबाबदारी पार पाडून तुम्हाला समाधान आणि शांती मिळेल.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022 : १० सप्टेंबरपासून सुरू होतोय पितृपक्ष; या काळात नेमकी कोणती कामं वर्ज्य मानली जातात जाणून घ्या

विनम्रता: एखादी व्यक्ती गोड बोलणारी असेल तर तो आपोआप अनेक समस्यांपासून सुटतो. तर संतप्त स्वभावामुळे व्यक्ती विनाकारण अनेक भांडणात अडकले जातात आणि त्याची प्रतिमाही खराब करतात. नम्र व्यक्ती लवकर प्रगती करते आणि लोकांच्या हृदयावर राज्य करते.

आणखी वाचा : सिंह राशीमध्ये सूर्य-शुक्र युती, या ३ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

देवाप्रती भक्ती: जीवनात कोणताही काळ असला तरी नेहमी देवाप्रती कृतज्ञता दाखवा. कारण पुष्कळ दु:ख देऊनही देव आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींचा आशीर्वाद देतो. देवाची भक्ती तुम्हाला प्रत्येक चांगल्या आणि वाईट वेळेला सामोरे जाण्याचे धैर्य देईल.