Daily Horoscope in Marathi, 28 May 2025 : २८ मे २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया आहे. द्वितीया तिथी रात्री १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. संध्याकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत धृति योग जुळून येईल. रात्री १ वाजून २९ मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

२८ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya 28 May 2025 In Marathi )

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )

कामात तुमचा आवेश कामाला येईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope )

कौटुंबिक कामातून लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)

तुमची धावपळ वाढू शकते. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope )

मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)

अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope )

चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात वावराल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी केल्या जातील.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope )

मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )

मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope )

काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope )

नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )

थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. कारण नसताना रागराग करू नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )

कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत. नसत्या शंका उत्पन्न करू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर