Chandra Grahan Negative Impact: यावर्षाचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार खूप खास मानले गेले आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होऊन ८ सप्टेंबरच्या पहाटे १ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. सुमारे ४ तास चालणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.
ज्योतिषाचार्यांच्या मते, ग्रहणाच्या वेळी चंद्र शनीच्या राशी म्हणजे कुंभ राशीत असतील, जिथे आधीच राहू बसलेला आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या युतीने ग्रहण योग तयार होतो. त्याच वेळी चंद्र पूर्वाभाद्रपद आणि शतभिषा नक्षत्रात असतील. याशिवाय पंचकही राहतील, ज्याला मृत्यू पंचक म्हटले जाते. मृत्यू पंचकात चंद्रग्रहण लागणे धोकादायक मानले जाते.
या चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे, पण ९ राशींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या राशींना शारीरिक-मानसिक ताण, नोकरी आणि व्यवसायात अडचणी किंवा वाईट परिणाम दिसू शकतात.
हे चंद्रग्रहण ब्लड मून म्हणजे लाल चंद्र आहे. यात चंद्राचा रंग लालसर, नारंगी किंवा गुलाबी दिसतो. शास्त्रानुसार असे ग्रहण खास प्रभावी आणि कधी कधी त्रासदायक मानले जातात.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण नफा कमी करून अनावश्यक खर्च वाढवू शकते. मन अस्थिर होऊ नये याची काळजी घ्या.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात असुरक्षितता आणू शकते. आई-वडिलांशी किंवा वाहनांशी संबंधित अडचणी येऊ शकतात.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीवरही दबाव येऊ शकतो.
सिंह राशी (Leo Horoscope)
या राशीच्या लोकांच्या दांपत्य जीवनात आणि नातेसंबंधांत तणाव येऊ शकतो. वाद टाळा आणि संयम ठेवा.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीभोवती पाप ग्रहांचा प्रभाव राहील. मानसिक ताण, आरोग्याच्या समस्या आणि कामात अडथळे येऊ शकतात.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना अपत्याबाबत चिंता आणि शिक्षणात अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांनी आई-वडिलांच्या आरोग्याची आणि घरातील भांडणांची काळजी घ्यावी. वाहनासंबंधी अडचणी आणि वाद होऊ शकतात.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
हे ग्रहण कुंभ राशीसाठी विशेष काळजीचे आहे कारण ते ह्याच राशीत होत आहे. आरोग्याचे त्रास, ताण आणि थकवा येऊ शकतो. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करू नका.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अशुभ ठरू शकते. आरोग्याचे त्रास आणि आर्थिक दबाव येण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)