Chandra Grahan Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी पितृ पक्षाच्या सुरुवातीलाच चंद्रग्रहण होणार आहे. त्या दिवशी शनी देव वक्री असतील. अशा वेळी पाहू या, चंद्रग्रहणावर शनी वक्री असणे कोणत्या ३ राशींसाठी शुभ आणि मंगलकारी ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पितृ पक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. खास गोष्ट म्हणजे ह्याच दिवशी शनी देव वक्री अवस्थेत गोचर करतील. असा दुर्मिळ योग अनेक वर्षांनंतर तयार होत आहे, जेव्हा पितृ पक्षात शनी देव वक्री म्हणजेच उलटी चाल सुरू करतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळीचे चंद्रग्रहणही शनीच्या राशीत होणार आहे. ही आकाशातील घटना काही राशींसाठी खास करून लाभदायक ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या राशीच्या लोकांवर या योगाचा चांगला परिणाम होईल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने खूप अनुकूल राहील. शनीचं वक्री गोचर कर्मभावात होत असल्याने करिअर आणि व्यापारात प्रगतीची शक्यता आहे. अशा वेळी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि नवीन प्रोजेक्टची सुरुवात केल्याने चांगला आर्थिक फायदा होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
शनी देव सध्या वृश्चिक राशीतून पंचम भावात वक्री गोचर करत आहेत. या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना संततीसुख मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला जाईल आणि सर्जनशील कामांमध्ये रस वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील राहील.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं वक्री गोचर खूप शुभ ठरेल. शनी देव जर लग्नभावात गोचर करत असतील, तर लोकप्रियता वाढेल आणि सामाजिक मान-सन्मान मिळेल. नात्यात सुधारणा होईल आणि भागीदारीशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)