Budh Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा वाणी, माध्यम, अर्थव्यवस्था, संवाद, शेअर बाजार व अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालींत बदल होतो तेव्हा तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. जून महिन्यात बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. त्यांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. चला,जाणून घेऊ अशा या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत?

मकर

बुध देवाचा राशिबदल मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तसेच, न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. हे राशिसंक्रमण करिअरमधील प्रगतीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरू शकते. तुम्ही खूप दिवसांपासून बढती मिळण्याची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपू शकते. तसेच, बुध ग्रह हा तुमच्या राशीच्या सहाव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही देश-विदेशांतही प्रवास करू शकता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – शुक्र राशीत बनणार बुधादित्य राजयोग; ‘या’ राशींचे लोक करणार छप्परफाड कमाई! नोकरी-व्यवसायात मिळेल यश?

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तसेच तुम्हाला नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल, तर त्यात फायदा होईल. तुम्हाला प्रेमात यश मिळू शकते. तसेच या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच तुमच्या मनातील काही स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तूळ

बुध राशीचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विवाहित लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. आदर वाढेल. तसेच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल. तसेच, यावेळी तुम्हाला देश-विदेशांतही प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

Story img Loader