Chaturmas 2025: ज्योतिषशास्त्रानुसार जुलैमध्ये सूर्य, बुध यांसारख्या काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे राशी परिवर्तन झाले आहे. तसेच नुकतीच ६ जुलै रोजी देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) साजरी करण्याच आली. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. तसेच कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिक एकादशीनंतर शुभ कार्यांना सुरुवात होते. यंदा १ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी साजरी केली जाईल. ६ जुलै ते १ नोव्हेंबरपर्यंतचा हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल. या काळात त्या राशीच्या व्यक्तींवर श्री विष्णूचा आशीर्वाद असेल.

चातुर्मास तीन राशींसाठी लाभदायी

मेष (Mesh Rashi)

चातुर्मासाचा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींनादेखील चातुर्मासाचा काळ खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल.

मीन (Mesh Rashi)

चार्तुमासाचा काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)