वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाशी गोचर किंवा युती करतो, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सध्या अशीच शुक्र आणि चंद्राची युती तयार झाली आहे. नुकतेच दोन दिवसांपुर्वी म्हणजे हिंदू नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी २३ तारखेला चंद्र आणि शुक्र ग्रहांची दुर्मीळ युती आपण आकाशात पाहिली आहे. तर पंचांगानुसार २४ तारखेला चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. जिथे शुक्रदेव आधीच विराजमान असल्यामुळे कलात्मक योग तयार होत आहे. या योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार आहे. पण त्यापैकी ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. तर त्या ३ राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.
मेष राशी –
कलात्मक योग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानात हा योग तयार होत आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात केंद्र गृह असे म्हटलं जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसंच तुमच्या सुख-साधनांमध्येही वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो. दुसरीकडे, जे कला क्षेत्राशी संबंधित आहेत (चित्रपट, मीडिया, फॅशन डिझायनिंग) त्यांच्यासाठी हा योग अद्भुत सिद्ध होऊ शकतो. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याचीही दाट शक्यता आहे.
कर्क राशी –
कलात्मक योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न स्थानी तयार होत आहे. ज्याची दृष्टी तुमच्या सातव्या स्थानी पडत आहे. त्यामुळे या काळात तुमचे जोडीदाराशी चांगले संबंध राहू शकतात शिवाय जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. व्यवसायातही चांगला नफा आणि सुख साधनांध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता.
कन्या राशी –
(हेही वाचा- शनिदेव उदय होताच बनला ‘शश राजयोग’; ‘या’ राशींना मिळू शकतो गडगंज पैसा, भाग्यही उजळणार?)
कलात्मक योग तयार झाल्यामुळे कन्या राशीतील लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते.कारण कन्या राशीच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या स्थानी हा योग तयार होत आहे. ज्याला वैदिक ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचा भाव मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्ही अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता. त्याच वेळी, तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. यासोबतच मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली असू शकते. तुम्हाला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनही या काळाच आनंदी असू शकते. या काळ व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल ठरु शकतो.
(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)