scorecardresearch

Premium

Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना भागीदारीतून चांगला नफा मिळणार, पाहा तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्ती डिसेंबर महिन्यातील पहिला दिवस मनाप्रमाणे घालवणार.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२३ (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Daily Rashibhavishya in Marathi, 1 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
The Prime Minister expressed the possibility of implementation of the code of conduct next month
‘मन की बात’ तीन महिन्यांसाठी स्थगित; पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता पंतप्रधानांकडून व्यक्त
grah gochar march 2024
मार्च महिन्यात ग्रहांचे होणार महागोचर! ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल! नोकरी-व्यवसायात मिळेल यश
Mars Mercury Venus Saturn conjunction will make in kumbh these zodiac will be lucky Mangal Shukra Shani Yuti
३० वर्षांनंतर शनी, मंगळ अन् शुक्राचा अद्भुत संयोग; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ?

वृषभ:-

आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

मिथुन:-

कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

कर्क:-

धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

सिंह:-

जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

कन्या:-

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:-

इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:-

आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.

धनू:-

कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

मकर:-

आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ:-

सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

मीन:-

आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 1 decemberdaily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 30-11-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×