Daily Rashibhavishya in Marathi, 16 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मोठा प्रवास करता येईल. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.

mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी
Shani Uday 18th March Kanya Sinha 6 Zodiac Signs Can Become Crorepati Till Shani Jayanti
शनी उदय: आजपासून ५० टक्के राशींच्या नशिबाला येईल जाग; ‘या’ ६ राशी शनी जयंतीआधी होणार करोडपती?

वृषभ:-

मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.

मिथुन:-

कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल. दिवस संमिश्रतेत जाईल. मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल.

कर्क:-

लहान प्रवास घडेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.

सिंह:-

अडकलेल्या कामांना जोर लावावा. नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्‍याकडून मदत मिळेल. बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा.

कन्या:-

घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची विचारपूर्वक अंमल बजावणी कराल. हातात काही अधिकार येतील.

तूळ:-

क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. आनंदाची अनुभूती घ्याल. मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील.

वृश्चिक:-

नियोजन बद्ध कामे करा. मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या. क्रोध वृत्तीला आवर घाला. कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

धनू:-

नातेवाईकांना मदत कराल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल. तरुण लोकांशी मैत्री होईल. कामात स्त्रियांची मदत लाभेल.

मकर:-

महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात. कमिशन मधून लाभ कमवा. दिनक्रम व्यस्त राहील. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.

कुंभ:-

मनाविरुद्ध गोष्टी करू नका. संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जवळचा प्रवास चांगला होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल.

मीन:-

विचार सतत बदलू नका. तडकाफडकी गोष्टी करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.