Aajche Rashi Bhavishya In Marathi 27 September 2025 : आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज प्रीती योग जुळून येईल आणि अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल आणि आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या नवरात्रीचा सहावा दिवस असणार आहे. आज कात्यायनी देवी कोणत्या राशीच्या मनोकामना पूर्ण करणार चला जाणून घेऊयात…

२७ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 27 September 2025 )

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. या मार्गावर काही अडचणी येतील. मेहनत व परिश्रम कायम ठेवा.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आनंदात घालवावा. मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. काही वेळ स्वत:साठी ठेवावा.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

आपल्या कडून उत्तम सहकार्‍याची अपेक्षा राहील. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. गरजेची कागदपत्रे जपून ठेवा.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

आहारातील पथ्ये पाळा. इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवा.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील. कमी बोलून कृतीवर भर द्यावा. याची सकारात्मक फळे दिसतील. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा. एखादे काम मधेच सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकार्‍यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. आपल्याच कामाशी संलग्न रहा.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे पार पडतील. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमचा प्रभाव कायम राहील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर