Daily Rashibhavishya in Marathi, 9 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे.

surya arun gochar 2025
२४ तासांनंतर ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ! सूर्य-अरुण ग्रहाची युतीने करिअरमध्ये प्रगती अन् मिळणार भरपूर पैसा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
shani dev uday saturn planet will rise in meen these zodiac sign get more profit
३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! ‘या’ राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, नव्या नोकरीसह मिळेल अपार धन
weekly numerology prediction 10 to 16 february 2025 saptahik ank jyotish numerology know your weekly numerological horoscope in Marathi
Saptahik Ank Rashifal: ‘या’ मूलांकाच्या लोकांचे चांगले दिवस येणार, अचानक धनलाभाचा योग, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती
Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
Sagittarius Horoscope
Sagittarius Horoscope Today : गणेश जयंतीचा शुभ दिवस धनु राशीला करणार मालामाल; पैसा, प्रेम सर्वकाही मिळणार, जाणून घ्या कसा जाईल संपूर्ण दिवस

वृषभ:-

आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन:-

आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क:-

जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

सिंह:-

स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या:-

आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

तूळ:-

घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

वृश्चिक:-

भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.

धनू:-

आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

मकर:-

नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

कुंभ:-

काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.

मीन:-

अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader