- मेष:-
व्यवहार कुशलता दाखवाल. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जोडीदाराची प्रेमळ बाजू समजून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे. उगाच चिडचिड करू नये. - वृषभ:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. कोणतीही लबाडी करू नये. भांडणात अडकू नका. कफ विकारांचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. - मिथुन:-
बैठ्या खेळात यश येईल. कामातील तांत्रिक बाजू समजून घ्यावी. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. फसवणूकीपासून सावध राहा. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. - कर्क:-
संभाषणाची आवड जोपासाल. जुने मित्र भेटतील. नातेवाईकांची मदत घ्याल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. कामाची धांदल उडेल. - सिंह:-
चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. कमात प्रगती करता येईल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. योग्य तर्क वापराल. कमिशनच्या कामातून फायदा संभवतो. - कन्या:-
गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. भडक शब्द वापरु नका. बुध्दिच्या जोरावर कामे मिळवाल. हसत-हसत कामे उरकून घ्याल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. - तूळ:-
चौकसपणे विचार कराल. कामात धुर्तपणा दाखवाल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. हटवादीपणा करु नये. कामात तत्परता दाखवाल. - वृश्र्चिक:-
उगाचच थापा मारु नयेत. कागदपत्रे नीट तपासून घ्यावेत. लबाड लोकांपासून दूर रहावे. प्रवासाची आवड पुर्ण कराल. जामीनकीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. - धनू:-
गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहानांशी मैत्री कराल. अधिकारी व्यक्तिंमध्ये वावराल. मित्रांनी वादविवाद करणे टाळावे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. - मकर:-
व्यवहारचातुर्य दाखवाल. स्वतः चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. हरहुन्नरीपणे वागाल. व्यावसायिक नफ्याकडे लक्ष ठेवाल. पुढील परिस्थितीचाअंदाज घ्यावा. - कुंभ:-
तुमच्यातील वक्तृत्व गुण दाखवाल. शिस्तप्रियता दर्शवाल. धोरणीपणे विचार कराल. वाचनाची आवड जोपासाल. प्रवासाचा आनंद घ्याल. - मीन:-
कफविकार त्रासदायक ठरतील. मनातील भीती काढून टाकावी. उगाच चिंता करत बसू नका. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. भावंडांना मदत कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 15-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 15 november 2019 aau