- मेष:-
हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - वृषभ:-
मुलांबरोबर मजेत दिवस घालवाल. साहित्याची आवड दर्शवाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित कराल. - मिथुन:-
दिवसभर कामात अडकून पडाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. जवळचे मित्र भेटतील. बागकामात लक्ष घालाल. स्थावरची कामे निघतील. - कर्क:-
भावनेला आवर घालावी लागेल. आवडते साहित्य वाचाल. कामात द्विधावस्था जाणवेल. घाईघाईने विचार मांडू नका. किरकोळ खरेदी कराल. - सिंह:-
गोड पदार्थ चाखायला मिळतील. योग्य वेळी हातातील अधिकार वापरावेत. भावंडाना मदत कराल. हातातील कामात चांगले यश मिळेल. तुमचा दर्जा सुधारेल. - कन्या:-
मानसिक व्यग्रता टाळावी. कामाचा बोजा वाढवू नये. वादविवादात लक्ष घालू नका. समयसूचकता वापरावी लागेल. नसते धाडस करू नका. - तूळ:-
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चुकीच्या लोकांच्या सहवासात अडकू नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. क्षुल्लक गोष्टींनी निराश होऊ नका. - वृश्चिक:-
सामाजिक वादात लक्ष घालू नये. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. केवळ स्वतःचेच खरे करत बसू नका. कामाचे योग्य नियोजन करावे. - धनु:-
ध्यानधारणा करावी. कामात चंचलता आणू नये. लहान मुलांच्यात रमाल. मैत्रीत सलोखा वाढवावा. नवीन विचारांची जोड घ्यावी. - मकर:-
तुमच्या अधिकारात वाढ होईल. काही नवीन कामे अंगावर येतील. मानसन्मानास पात्र व्हाल. एखादे प्रशस्तीपत्र मिळवाल. इतरांना मदत करण्यात आनंद मनाल. - कुंभ:-
पोटाची किरकोळ तक्रार राहील. मोठ्या व्यक्तींची घरात उठबस राहील. सर्वांचे आपुलकीने कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. पत्नीची प्राप्ती वाढेल. - मीन:-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. अति अपेक्षा ठेवू नका. व्यावसायिक गोष्टीत दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसंग उदभवू शकतात.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 23-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 23 november 2019 aau