- मेष:-
भावंडांच्या मदतीला धावून जावे लागेल. अतिविचार करू नका. कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. निश्चित अनुमान काढावा. कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवावे. - वृषभ:-
व्यवहार कुशलता दाखवाल. जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. तुमच्यातील सुशिक्षितपणा दिसून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. व्यापारात चांगला फायदा होईल. - मिथुन:-
इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मतभेदातून गैरसमज वाढवून घेऊ नका. बोलण्यात खरेपणा दर्शवावा. अविचाराला मनातून काढून टाकावा. - कर्क:-
लेखनाला बळ मिळेल. बौद्धिक छंद जोपासाल. उपासनेकडे दुर्लक्ष करू नका. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे कौतुक होईल. बौद्धिक चुणूक दाखवाल. - सिंह:-
चार-चौघांत ठामपणे मत व्यक्त कराल. मानसिक तोल सांभाळावा. तामसी पदार्थ खाणे टाळावेत. अवाजवी खर्च आवरता घ्यावा. गप्पांमध्ये रमून जाल. - कन्या:-
चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. जवळच्या ठिकाणी धार्मिक यात्रा काढाल. चलाखीने कामे कराल. उत्साह ढळू देऊ नका. व्यावसायिक लाभाचा दिवस. - तूळ:-
व्यावहारिक बुद्धिमत्ता वाढीस लावाल. आर्थिक मनाचे नवीन मार्ग शोधाल. कमिशनमध्ये चांगला फायदा होईल. लेखकांना स्फूर्ती मिळेल. वक्तृत्व गुण जोपासाल. - वृश्चिक:-
हजर-जबाबीपणे उत्तर द्याल. धूर्तपणे फायदा साधून घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तत्परतेने कामे कराल. - धनु:-
कागदपत्रांची व्यवस्थीत छाननी करावी. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. जामिनकीचे व्यवहार जपून करावेत. पारमार्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. प्रवासात काळजी घ्यावी. - मकर:-
तरुण लोकांशी मैत्री कराल. लहानांशी खेळण्याचा आनंद घ्याल. मित्रांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल. गप्पागोष्टींत दिवस जाईल. - कुंभ:-
तुमच्यातील कल्पकता दिसून येईल. मध्यस्थीचा लाभ उठवाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे. नवीन मित्र जोडावेत. एकटेपणा बाजूला ठेवावा. - मीन:-
बौद्धिक कामांत यश येईल. वक्तृत्वातून छाप पडाल. शिस्तीचा बडगा करू नका. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 27-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 27 october 2019 aau