- मेष:-
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. भागदाराशी मतभेद टाळा. जुगाराची आवड जोपासाल. दुरावा टाकण्याचा प्रयत्न करावा. - वृषभ:-
कोर्टाची कामे निघतील. जुन्या गोष्टी उकरून काढू नयेत. भावनेला आवर घालावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. सामाजिक कामात हातभार लावाल. - मिथुन:-
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आळस बाजूला सारावा. - कर्क:-
कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. नातेवाईकांची उठबस वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवाल. - सिंह:-
तुमच्या कर्तबगारीला उत्तम वाव मिळेल. हातापायाची काळजी घ्यावी. शुद्ध अंत:कारणाने सर्वांना मदत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटीपीकडे अधिक लक्ष द्याल. - कन्या:-
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निसर्ग सौंदर्यात रममाण व्हाल. - तूळ:-
गोड बोलण्यावर भर द्याल. इतरांवर चांगली छाप पाडाल. परखडपणे आपले मत मांडाल. कामाचा जोम वाढेल. तुमच्यातील कार्यप्रविणता दिसून येईल. - वृश्चिक:-
शांतपणे विचार करावा. जुन्या गोष्टी सामोऱ्या येऊ शकतात. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. गैरसमजामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. - धनु:-
मित्रांशी होणारे मतभेद टाळावेत. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. जमिनीच्या कामातून आर्थिक लाभ होईल. चैनीच्या वृत्तीत वाढ होईल. औद्योगिक वाढीचा विचार करावा. - मकर:-
कामात काही अपेक्षित बदल घडून येतील. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. घरातील कामाची धावपळ राहील. उत्तम कौटुंबिक वातावरण राहील. - कुंभ:-
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. दुचाकी वाहन चालविताना काळजी घ्यावी. काटकसर करावी लागेल. उगाचच मनात चिंता निर्माण होईल. - मीन:-
घरातील कामाची धांदल उडेल. जोडीदाराविषयी होणारे मतभेद बाजूला सारावेत. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. मानापमान मनावर घेऊ नयेत. भाजणे,कापणे यांसारखे त्रास जाणवतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 12-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 12 november 2019 aau