- मेष:-
अचानक अनपेक्षित लाभ होतील. वैवाहिक संबंध दृढ करावेत. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक व्यग्रता जाणवेल. पोटाची काळजी घ्यावी. - वृषभ:-
जोडीदाराचे प्रेम वाढीस लागेल. वैवाहिक सौख्याला बहर येईल. भागीदारीतून चांगला फायदा होईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. दिवस मनाजोगा घालवता येईल. - मिथुन:-
उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. मानसिक तोल ढळू देवू नका. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. गैरसमज दूर करावेत. - कर्क:-
जुगारातून यश संभवते. नवीन मित्र जोडाल. दिवसभर खेळीमेळीचे वातावरण असेल. करमणुकीत वेळ घालवाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. - सिंह:-
घरात टापटीप ठेवाल. बागकामात हातभार लावाल. सौदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. तुमचा दरारा वाढेल. - कन्या:-
जवळचा प्रवास मजेत होईल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. गायक मंडळींना प्रशस्तीपत्र मिळेल. कौटुंबिक खर्च वाढेल. जवळचे सखे-सोबती भेटतील. - तूळ:-
कामामुळे थकवा जाणवेल. उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतात. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ चाखाल. आवडीबाबत आग्रही राहाल. - वृश्चिक:-
प्रेमसौख्यात न्हाहून निघाल. अंगीभूत कलेला उठाव मिळेल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. मनाजोगी चैन कराल. मानसिक स्थैर्य लाभेल. - धनु:-
काही गोष्टी तात्पुरत्या असतील. फसवणुकीपासून सावध राहावे. झोपेची तक्रार मिटेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. अपयशाने खचून जावू नका. - मकर:-
मानसिक शांतता लाभेल. आवडत्या वस्तू खरेदी कराल. जवळच्या मित्रमंडळीत दिवस व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. - कुंभ:-
कामात किरकोळ अडचणी येवू शकतात. इतर गोष्टीत फार लक्ष घालू नका. कमिशनमध्ये चांगला फायदा संभवतो. तुमच्या वक्तृत्वाची चांगली छाप पडेल. व्यावसायिक वृद्धी संभवते. - मीन:-
गृरुकृपेचा लाभ घ्यावा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. कामातील चिकाटी सोडू नका. योग्य संगतीत वावराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 30-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 30 october 2019 aau
