Horoscope Today 10 November 2025 : आज १० नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. आज पुनर्वसु नक्षत्र जागृत असणार आहे आणि साध्य योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ ७ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज चंद्र मिथुन राशीत गोचर करत आहे. तर तुमचा सोमवार खास जाणार का जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १० नोव्हेंबर २०२५ (Daily Horoscope 10 November 2025 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
चांगली मन:शांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
जोडीदाराच्या मताचा विचार करावा. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. फसवणुकीपासून सावध राहावे.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. गप्पांचे फड जमवाल. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल. छंद जोपासायला वेळ काढाल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
घरासाठी पैसे खर्च कराल. मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होईल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. दिवस धावपळीत जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. जुने मित्र भेटतील.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल. अनिश्चिततेचे मळभ दूर होईल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मिळालेल्या संधीचे सोने करावे. बोलतांना भान हरवू नका.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
