Aajche Rashi Bhavishya In Marathi 13 October 2025 : आज १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी आणि नवमी तिथी असणार आहे. आज सिद्धी योग जुळून येईल आणि पुनर्वसू नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सुरु होईल ते ४ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा आजचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…

१४ ऑक्टोबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi 14 October 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तु सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर