Rashi Bhavishya In Marathi 25 September 2025 : आज २५ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. आज वैधृती योग जुळून येईल आणि स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल आणि आज राहू काळ ३ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या नवरात्रीचा चौथा दिवस असणार आहे. आज कुष्मांडा देवी कोणत्या राशीच्या मनातील शंका दूर करणार जाणून घेऊयात…
२५ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi 25 September 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल. मनातील नसत्या कल्पना काढून टाका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
अति गोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. घरात शांतता नांदेल. धार्मिक कामाकडे कल राहील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर