Horoscope Today In Marathi 27 October 2025 : आज २७ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. आज अतिगंड योग जुळून येईल आणि मूळ नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७ वाजून ५२ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर मेष ते मीन आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊया…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५ (Today Horoscope 27 October 2025 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
