Today Horoscope in Marathi, 19 April 2025 : १९ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. मूळ नक्षत्र सकाळी १० वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र सुरु होईल. दुपारी १२:५२ वाजेपर्यंत शिवयोग सुरू राहील. शिव म्हणजे – शुभ. शिवयोग हा शुभ असतो. या योगात केलेली सर्व कामे यशस्वी होतात. शिवयोगात जर परमेश्वराचे नाव घेतले तर ते शुभफलदायी ठरते. आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजेपर्यंत असणार आहे. तर आज शिवयोग कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार हे आपण जाणून घेऊया…
१८ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya in Marthi) :
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तम रित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
आज कर्क राशींच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर