Rashi Bhavishya In Marathi 29 August 2025 : आज २९ ऑगस्ट २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी संध्याकाळी रात्री ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. आज स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे आणि ब्रम्ह योग जुळून येणार आहे. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर शुक्रवारी लक्ष्मी तुमच्या राशीचे दार कसे ठोठावणार जाणून घेऊया…
२९ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 29 August 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
मनाची चंचलता वाढू शकते. पूजा-अर्चा मध्ये मन रमवाल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाची योग्य पावती मिळेल. धन संचयात वाढ होईल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
प्रलंबित कामे सामोरी येतील. भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. दिवस धावपळीत जाईल. कष्टाला पर्याय नाही.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
देणी चुकती करावी लागतील. विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
बुद्धिमत्तेचा कस लागू शकतो. मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. मित्रांची मदत घ्यावी लागेल. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराचा वरचष्मा राहील. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्यांच्या सल्ल्याने वागावे. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
कामाचा मनापासून आनंद घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सहकार्यांकडून फार अपेक्षा बाळगू नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
दृष्टीकोनात बदल करून पहावा. सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल. आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
पत्नीशी वाद वाढवू नका. मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
इतरांचा विश्वास कमवावा. भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल. वादाचे मुद्दे टाळावेत.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
सौम्य शब्दांत मत मांडा. प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका. करमणुकीत जास्त वेळ घालवाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर