Daily Horoscope 9 november 2025 In Marathi : आज ९ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज सिद्धी योग जुळून येईल आणि आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे आणि सिद्धी योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ ४ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीचा रविवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२५ (Today Horoscope 9 November 2025 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. अधिक काम अंगावर पडू शकते. आज काहीशी धावपळ करावी लागू शकते. कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घ्यावे. इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
घाईने निर्णय घेऊ नयेत. नवीन कामासाठी घाई करू नये. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. सारासार विचार हितकारक ठरेल. कुटुंबाला आधी प्राधान्य द्यावे.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
व्यावसायिकांना चांगला दिवस. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. आर्थिक पातळी संतुलित राहील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या गाठी-भेटी संभवतात.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
विवाहाची बोलणी पुढे सरकतील. सामाजिक मान वाढेल. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
प्रवास संभवतो. संवादाने प्रश्न सुटू शकतील. नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील. विरोधक परास्त होतील.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
प्रलंबित येणी वसूल होतील. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका. मानसिक शांतता लाभेल. मित्रांची योग्य वेळी मदत होईल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आव्हानात्मक असेल. धावपळ करावी लागू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आपले मत इतरांना पटवून द्याल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. कामे सुरळीत पार पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. धनलाभाचे योग जुळून येतील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. उगाच नसत्या काळज्या करू नका. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील. सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील. चांगला आर्थिक लाभ होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
