Dev Diwali Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार, या वर्षीची देव दिवाळी खूप खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत. याचा परिणाम १२ राशींवर तसेच देश-विदेशातही दिसणार आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी हा पवित्र सण साजरा केला जातो. याला देव दीपावली, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. ही दिवाळीनंतर साधारण १५ दिवसांनी येते.
यावर्षी देव दिवाळी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. या दिवशी दुर्मिळ असे अनेक राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांची कृपा होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे…
ज्योतिषशास्त्रानुसार, देव दिवाळीच्या दिवशी चंद्र मेष राशीत असतील. तसेच शनी मीन राशीत वक्री राहून विपरीत राजयोग तयार करतील. गुरु आपल्या उच्च राशी कर्कमध्ये राहून हंस राजयोग तयार करतील, तर शुक्र आपल्या मूल त्रिकोण राशी तूळ मध्ये राहतील, ज्यामुळे मालव्य योगासोबत केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होईल.
कुंभ राशीत राहू असल्यामुळे नवपंचम राजयोग होईल. ग्रहांचा सेनापती मंगळ आपल्या वृश्चिक राशीत राहून रूचक योगासह विपरीत आणि केंद्र-त्रिकोण राजयोग निर्माण करेल. सूर्य तूळ राशीत राहून शुक्रासोबत शुक्रादित्य योग तयार करेल, आणि बुधही वृश्चिक राशीत मंगळासोबत असेल. या दिवशी सिद्धी, अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योगाचाही निर्माण होणार आहे. तसेच देव दिवाळीच्या दिवशी शनी मीन राशीत वक्री स्थितीत राहतील.
मेष राशी (Aries Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी देव दिवाळीच्या दिवशी तयार होणारे दुर्मिळ योग अनेक क्षेत्रात फायदे देऊ शकतात. मंगळदेव आठव्या भावात राहून विपरीत राजयोग तयार करत आहेत. तसेच सातव्या भावात शुक्र मालव्य राजयोग बनवत आहेत, गुरु चौथ्या भावात, राहू अकराव्या भावात आणि शनी बाराव्या भावात गोचर करत आहेत.
या स्थितीत या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ होऊ शकतो. जीवनातील सुख-सुविधा जलद वाढतील. पितृसंपत्तीवरील जुना वाद संपुष्टात येऊ शकतो आणि त्यातून चांगला फायदा होऊ शकतो. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांतही लाभ होण्याची शक्यता आहे. विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची उत्तम संधी मिळू शकते. तसेच जीवनात आनंद आणि समाधानाचे क्षण येऊ शकतात.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी देव दिवाळीचा दिवस खूप खास ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बरीच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. मंगळ पंचम भावात, शनी नवम भावात आणि शुक्र तिसऱ्या भावात असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची मजबूत साथ मिळू शकते.
शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. अध्यात्माकडे ओढ वाढेल आणि आत्मचिंतनातून जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. मानसिक तणावातून आराम मिळण्याची शक्यता आहे. मंगळाच्या प्रभावामुळे केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
मोठं घर, लक्झरी वाहन, जमीन-जुमला आणि संपत्ती मिळण्याचे योग दिसत आहेत. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता जास्त आहे. शनीमुळे तयार झालेला विपरीत राजयोग या राशीच्या लोकांना नशिबाचा पूर्ण साथ देईल आणि जुनी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
वृश्चिक राशी (Capricorn Horoscope)
या राशीच्या लोकांसाठीही देव दिवाळीचा दिवस खूप खास ठरणार आहे. या राशीच्या लग्नभावात मंगळ आहेत, तर दैत्य गुरु शुक्र १२व्या भावात राहून विपरीत राजयोग तयार करत आहेत. तसेच देवगुरु गुरु आपल्या उच्च राशीत राहून भाग्यभावातून गोचर करत आहेत.
यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाचा पूर्ण साथ मिळू शकतो. बरीच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धन-संपत्ती वाढेल. धनलाभाचे योग बनत आहेत. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. अध्यात्माकडे झुकाव वाढेल.
संतानाशी संबंधित काही शुभ बातमी मिळू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद आणि सुखाचे क्षण येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
