Dhanteras Broom Buying: हिंदू धर्मात दिवाळीला खूप पवित्र मानले जाते. हा सण फक्त प्रकाश आणि आनंदाचा नाही, तर लक्ष्मीमातेच्या स्वागताचा दिवस आहे. दिवाळीच्या आधी लोक घराची साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावट याकडे विशेष लक्ष देतात. दिवाळीचा हा शुभ सण धनत्रयोदशीपासून सुरू होऊन भाऊबीजपर्यंत पाच दिवस चालतो. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते- विशेषत: झाडूची खरेदी.
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे का शुभ आहे?
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते कारण झाडू लक्ष्मीमातेचे प्रतीक मानली जाते. मत्स्यपुराणात असे लिहिले आहे की झाडू घराची साफसफाई करण्यासोबतच नकारात्मक ऊर्जा दूर करते. असे मानले जाते की या दिवशी नवीन झाडू घरात आणल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी, धन आणि ऐश्वर्य येते.
तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नये, असे का म्हणतात?
वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली किंवा जुनी झाडू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा झाडूमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक शक्ती वाढू शकतात. त्यामुळे झाडू तुटायला लागली की ती लगेच बदलावी.
जुनी झाडू कधी टाकावी?
वास्तुशास्त्रानुसार, जुनी किंवा तुटलेली झाडू कोणत्याही दिवशी टाकणे योग्य नाही. झाडू टाकण्यासाठी शनिवार, अमावस्या, होलिका दहन नंतरचा दिवस किंवा ग्रहणानंतरचा काळ शुभ मानला जातो. या दिवशी झाडू टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर जाते.
नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शुभ वेळ कोणती?
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात चांगली वेळ दुपार नंतरपासून सूर्यास्तापर्यंत मानली जाते. रात्री झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते, म्हणून त्या वेळी खरेदी टाळावी.
जुनी झाडू कुठे आणि कशी फेकावी?
वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही जाळू नये, यामुळे दुर्दैव वाढू शकतो. झाडू अस्वच्छ किंवा अशुद्ध ठिकाणीही टाकू नये. जुनी झाडू अशा ठिकाणी ठेवा किंवा टाका जिथे कोणी चालत नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)