Gajkesari Yog 2024 : ज्योतिषशास्त्रात देवांचा गुरु म्हणून गुरु ग्रहाकडे पाहिले जाते. हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. गुरु एका राशीत सुमारे वर्षभर राहतो, अशाप्रकारे या ग्रहाला संपूर्ण राशी चक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. सध्या गुरु वृषभ राशीत आहे आणि २०२५ च्या मध्यापर्यंत या राशीत राहील. अशा स्थितीत गुरुचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होते. यात गुरुचा चंद्राशी जास्तीत जास्त संयोग होतो, कारण चंद्र दर अडीच दिवसात आपली राशी बदलतो. दिवाळीपूर्वी पुन्हा गुरुचा वृषभ राशीत चंद्राबरोबर संयोग होणार आहे. चंद्र आणि गुरुच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होईल, हा योग अनेक राशींचे भाग्य उजळवू शकतो. त्यांना भौतिक सुख मिळू शकते तसेच आर्थिकदृष्ट्या ते अधिक सक्षम होऊ शकतात. वृषभ राशीत चंद्र आणि गुरुच्या संयोगाने तयार होणाऱ्या गजकेसरी योगाने कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते जाणून घेऊ…

पंचांगानुसार, १७ ऑक्टोबरला चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल आणि १९ ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील. अशा स्थितीत वृषभ राशीत चंद्राचा गुरुशी संयोग होईल.

मेष

गुरु आणि चंद्राच्या संयोगाने तयार होणारा गजकेसरी योग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो. कर्जमुक्तीबरोबर पैशांची बचत करू शकता. जीवनात अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात. सुख-शांती, समाधान मिळू शकेल. तुम्ही अनावश्यक खर्चापासून दूर राहू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. कुटुंबातील तणाव कमी होत सर्वांना आनंदाने जीवन जगता येईल. गुरूच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. अध्यात्माकडे तुमची आवड वाढेल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग जुळून येईल. सासरच्या लोकांशी संबंध चांगले राहतील.

कन्या

गजकेसरी योग कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातही आनंदाचे दिवस घेऊन येऊ शकतो. गुरु आणि चंद्राच्या आशीर्वादाने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनात अनेक प्रकारच्या आनंदाचे क्षण येतील. या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग भाग्यवान ठरेल. नवीन काम आणि व्यवसायासाठी हा काळ खूप शुभ आहे. या काळात केलेल्या शुभ कार्यामुळे तुम्हाला भरपूर यश मिळू शकते, त्यामुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्हाला तुमच्या गुरु आणि वडिलांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. लग्नासाठी जोडीदार शोधण्यात यश मिळेल, वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याची योजना आखू शकता. आरोग्यही चांगले राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळ

गजकेसरी राजयोगाने तुळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात भरपूर पैसे कमावण्याव्यतिरिक्त, तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवू शकता. कामाच्या संदर्भात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, यामुळे तुम्हाला भविष्यात बरेच फायदे मिळू शकतात. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमच्यात शांतता निर्माण होऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.