Rashi Bhavishya In Marathi 22 October 2025 : आज २२ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या असणार आहे. आज प्रीती योग जुळून येईल आणि स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. दीपावली पाडवा कोणत्या राशीसाठी कसा जाणार चला जाणून घेऊयात…
२२ ऑक्टोबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi 22 October 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
अचानक उद्भवणार्या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर