Abroad Career Numerology :विदेशात स्थायिक होणं आणि डॉलर्समध्ये कमाई करणं हा अनेकांचा स्वप्नवत प्रवास असतो. परंतु प्रत्येकालाच हे भाग्य लाभत नाही. अंकशास्त्रानुसार मात्र काही विशिष्ट जन्मतारखेला जन्मलेले लोक या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात. हे लोक केवळ परदेशात फिरण्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर तेथील संस्कृती, शिक्षण, आणि करिअरमध्येही स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात.
कमी वयातच करतात परदेश प्रवास
अशा लोकांना तरुण वयातच परदेशप्रवासाचे संधी मिळतात. शिक्षण, उच्च पदवी किंवा नोकरीच्या निमित्ताने ते जगभर भ्रमंती करतात. काहींचे नशीब इतके बलवान असते की ते परदेशात स्थायिक होऊन तिथेच करिअर घडवतात आणि डॉलर्समध्ये कमाई करतात.
मूलांक ३
ज्यांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ३ ठरतो. या मूलांकाचे अधिपती ग्रह आहेत देवगुरु बृहस्पति. बृहस्पतीच्या कृपेने हे लोक बुद्धिमान, विद्वान आणि आत्मविश्वासी असतात. त्यांना शिक्षण, अध्यापन, सल्लागार क्षेत्रांमध्ये यश मिळते आणि देश-विदेशात आपला ठसा उमटवतात.
मूलांक ५
५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ५ असतो. या अंकाचे अधिपती ग्रह आहेत बुध, जो व्यापार, संवाद आणि बुद्धीचा कारक आहे. अशा लोकांची व्यावसायिक बुद्धी तल्लख असते. ते बोलण्यात आणि पटवण्यात पारंगत असल्याने त्यांचे नेटवर्क परदेशातही विस्तारते. अनेकदा त्यांचा व्यवसाय परदेशात वाढतो आणि ते सहजपणे स्थायिक होतात.
मूलांक ९
९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असून त्यांचे अधिपती ग्रह आहेत मंगळ. मंगळाच्या प्रभावाने हे लोक साहसी, पराक्रमी आणि निर्णयक्षम असतात. एकदा ठरवलं की हे लोक परदेशात जाऊन दाखवतात. त्यांच्या कष्ट आणि धैर्यामुळे ते नोकरी, व्यवसाय किंवा स्टार्टअपमध्ये परदेशात मोठं यश मिळवतात.
अशा लोकांना ३० वर्षांनंतर जीवनात मोठे बदल जाणवतात. करिअर, संपत्ती आणि स्थैर्य या तिन्ही बाबतीत त्यांची झेप वाढते आणि ते ‘डॉलर मिलियनेर’ बनतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)