वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात चार ग्रहांच्या राशींमध्ये मोठे बदल होणार आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि शेवटी नेपच्यून हे ग्रह राशी बदलणार आहेत. ज्यामध्ये सर्वात आधी १३ फेब्रुवारी रोजी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर, १५ फेब्रुवारीला कुंभ राशी सोडल्यानंतर शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये गोचर करेल. तर १८ फेब्रुवारीला नेपच्यून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या बदलाचा प्रभाव सर्व राशीतील लोकांवर पाहायला मिळेल. पण त्यातही अशा चार राशी आहेत ज्यांच्यासाठी या चार ग्रहांचे गोचर फायदेशीर ठरू शकते. तर त्या चार राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशी –
मेष राशीतल लोकांसाठी ४ ग्रहांचे राशी बदल शुभ आणि फायदेशीर ठरू शकतात. या बदलामुळे या राशीतील लोकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. यासोबतच त्यांना सुखप्राती होण्याचीही शक्यता आहे. तसंच तुम्ही या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करु शकता. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्हे आहेत. मात्र, यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी लागणार कारण या परिस्थित तुम्ही तणावात जाण्याचाही शक्यता आहे.
हेही वाचा- शनिदेव सोन्याच्या पायांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षभर होऊ शकतो प्रचंड धनलाभ
कन्या राशी –
कन्या राशीसाठी फेब्रुवारी महिना लाभदायक ठरू शकतो. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत अशांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमची रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला भावंडाचे सहकार्य मिळू शकते. तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
तूळ राशी –
तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अनुकूल ठरु शकतो. या राशीतील ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवाय व्यावसायिकांना नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो. या राशीतील विवाहित लोकांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात सुधारणा आणि बळ येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता.
धनु राशी –
फेब्रुवारी महिन्यात चार ग्रहांचे राशी परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण १७ जानेवारीपासून या राशीतील लोकांना शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचं एखादं काम किंवा व्यवसाय मंदगतीने चालला असेल तर त्याला आता गती येऊ शकते. दुसरीकडे, नोकरदार लोक पैशांची बचत करु शकतात. शिवाय या राशीतील लोक कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)