Four Rajyog in Diwali 2023: गणेशोत्सवानंतर आता सगळ्यांनाच दिवाळीची चाहूल लागली आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे. पंचांगानुसार, यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होणार आहे. या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला चार राजयोग तयार होणार आहेत. शनिदेव शश राजयोग निर्माण करणार आहेत. मंगळ आणि सूर्यदेवाच्या युतीनेही राजयोग तयार होणार आहे. शनिदेव स्वराशीत प्रवेश करुन शश राजयोग घडवणार आहेत. तर आयुष्यमान योग ही याच काळात तयार होणार आहे. अशाप्रकारे चार राजयोग बनल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…

‘या’ राशींचे लोक मालामाल होणार?

मेष राशी

चार राजयोग बनल्याने मेष राशींच्या लोकांना या काळात चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. मेष राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनुकूल परिणाम मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदाने भरलेले राहू शकते.

(हे ही वाचा : २०२४ पासून ‘या’ राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु? देवगुरुच्या कृपेने धनलाभ होऊन राजकारणी लोकांना मिळू शकतो पद)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना यंदाच्या दिवाळीत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हे चार राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात या राशीतील लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर राशी

मकर राशीचे लोकं खूप मेहनती असतात. यंदाच्या दिवाळीत चार राजयोग बनल्याने या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरु शकतात. या काळात प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरु शकतो. बोनस, पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)