Gaj Kesari Yog 2025 Jupiter and Moon Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, २९ एप्रिलच्या दिवशी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे मोठा राजयोग निर्माण होणार आहे, २९ एप्रिल रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीत चंद्राच्या भ्रमणानंतर, या राशीत आधीच उपस्थित असलेल्या देवगुरूशी चंद्राची युती होईल. गुरुबरोबर चंद्राच्या संयोगाने ‘गजकेशरी राजयोग’ निर्माण होईल. गजकेसरी राजयोग हा ज्योतिषशास्त्रात शुभ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या योगामुळे काही राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. कोणत्या राशींना शुभ फले प्राप्त होऊ शकतील, कोणत्या राशींना गुरु आणि चंद्रकृपा लाभू शकेल, जाणून घेऊया…

‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग वृषभ राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. करिअरच्या क्षेत्रात चांगले बदल तुम्हाला दिसून येऊ शकतात. करिअरमध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी कानावर पडू शकते. तब्येतीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन लाभू शकतात.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग कर्क राशींच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. तुम्ही तुमच्या जीवनात चांगले बदल पाहायला मिळू शकतात. तुम्हाला पालकांचे सहकार्य लाभू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग तूळ राशींच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश लाभू शकतो. परदेश व्यापारात विस्तार होण्याचे शुभ संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदी आनंद असणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते.

धनू

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग धनू राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. सुखसोयींबरोबर मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो. या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल. सध्या सुरू असलेला मालमत्तेचा वाद संपुष्टात येऊ शकतो. मुलांकडून तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंच भरारी घेऊ शकता. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरु शकतो. करिअरमध्ये केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते. काही नवीन काम सुरू करू शकता. सरकारकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला काही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)