Gajkesri Raj Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करताना राशीचक्रातील १२ राशींवर शुभ अशुभ प्रभाव होत असतात. ग्रह मार्गीक्रमण करताच काही राशींना सुखाचा तर काहींसाठी कष्टाचा काळ सुरु होतो. आता २०२२ च्या ३१ डिसेंबरला म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत अगोदरच २४ नोव्हेंबरपासून गुरु ग्रह उपस्थित आहे. चंद्र व गुरूच्या युतीने मीन राशीत गजकेसरी राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांना यामुळे प्रचंड धनलाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार आहे हे आता आपण पाहुयात..

गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ

कुंभ:

कुंभ राशीच्या मंडळींसाठी गजकेसरी राजयोग हा अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या कुंडलीच्या प्रभाव कक्षेत दुसऱ्याच स्थानी हा राजयोग तयार होत आहे. हे स्थान धन व वाणीचे स्थान म्हणून ओळखले जाते. यामुळेच येत्या काळात आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. या काळात आपल्याला दीर्घकाळ टिकणारी संपत्ती लाभू शकते. कुंभ राशीचे असे व्यक्ती जी मीडिया व मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना हा काळ प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे.

मिथुन:

मिथुन राशीच्या मंडळींना गजकेसरी राजयोगाने आर्थिक स्थितीत प्रगतीचे योग आहेत. आपल्या कुंडलीच्या प्रभावकक्षेत गजकेसरी राजयोग हा दहाव्या स्थानी स्थिर होत आहे. हे स्थान कार्याशी संबंधित आहे. येत्या काळात आपल्याला हव्या तशा नोकरीचे योग येण्याची संधी आहे. आपण ज्या ठिकाणी सध्या कार्यरत आहात ती कंपनी आपल्याला परदेशवारीची संधी देऊ शकते. तसेच आपल्याला या नव्या लाभांसह काही जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातील मात्र याचा लाभ तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. आपण नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत.

हे ही वाचा<< २०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृषभ:

गजकेसरी योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून अकराव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर्थिक बाबतीतही लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे)