Gajkesari Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात.
पंचांगानुसार, ११ जून रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार असून या राशीत तो १४ जूनपर्यंत राहील. तसेच गुरू ग्रह धनु राशीच्या सप्तम भावात विराजमान राहील आणि त्याची दृष्टी एकादश भाव, प्रथम भाव आणि तृतीय भावावर पडत आहे. पहिल्या भावात चंद्र असल्याने गजकेसरी राजयोग निर्माण होईल, ज्याचा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
गजकेसरी राजयोग देणार पदोपदी यश
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.
कुंभ (Kumbh Rashi)
कुंभ राशीसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरेल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)