Ganesh Chaturthi 2025 Horoscope: हिंदू पंचांगानुसार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाची सुरूवात होणार असून ७ सप्टेंबर हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असेल. या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. यंदा गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी बुद्धीचा कारक ग्रह बुध देखील राशी परिवर्तन करणार आहे. बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर खूप सकारात्मक ठरेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

कुंभ (Kumbha Rashi)

बुधाचे गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर भाग्यशाली सिद्ध होईल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासह दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)