Ganga Dussehra Siddhi Ravi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, व्रत आणि सणांवर अनेक शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होत असतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर होत असतो. यात गंगा दशहराच्या दिवशी चार मोठे दुर्मीळ योग जुळून येत आहेत.

तसेच गंगा दशहराच्या दिवशी सकाळी सिद्धी योग जागृत असेल. तसेच रवि योग आणि हस्त नक्षत्रदेखील असेल. यानंतर तैतील करण दुपारी १ वाजून ०२ मिनिटांपर्यंत राहील. यासह बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने भद्र राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नेमके कोणत्या राशींसाठी हे योग फलदायी ठरू शकतात जाणून घेऊ…

वृषभ

गंगा दसरा वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुम्हाला त्यात गती आणि यश मिळू शकते. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी गंगा दशहरा सकारात्मक ठरू शकतो. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला पालकांकडून किंवा मोठ्यांकडून सहकार्य मिळेल. मानसिक शांती राहील आणि घरगुती बाबींमध्ये तुमचे मोलाचे योगदान असेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळण्याचे संकेतदेखील आहेत. तसेच या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता, जो तुमच्या करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन

गंगा दशहरा मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमचे व्यक्तिमत्त्वही सुधारेल. समाजात अधिक लोकप्रिय व्हाल, मान आणि प्रतिष्ठा मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी निरोगी असेल. जुन्या समस्यांपासून आराम मिळेल.