scorecardresearch

Gautam Adani Astrology: गौतम अदाणींसाठी शनीची साडेसाती सुरू झाली? अदाणींपुढील अडचणी वाढण्याचा ज्योतिषशास्त्राचा अंदाज!

Gautam Adani Horoscope: गौतम अदानी सध्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. त्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू झाल्याचा दावा ज्योतिषशास्त्राच्या आधारावर केला जात आहे.

Gautam Adani Horoscope
गौतम अदानींवर शनी साडेसाती सुरू (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautam Adani Horoscope: अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी आता पहिल्या दहामधूनही बाहेर फेकले गेले आहेत. रिसर्च फर्म, हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खळबळ उडाली आणि फक्त दोन दिवसांत समभागात मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांतच अदानी यांच्या संपत्तीत $९१ अब्ज पेक्षा जास्त घट झाली आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये गौतम अदाणींच्या कुंडलीचा आणि त्यात असलेल्या साडेसातीचा किती हात आहे? ज्योतिषशास्त्राच्या आधारावर यासंदर्भात दावा करण्यात येत आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

गौतम अदानींवर शनीची साडेसाती सुरु?

गौतम अदानी यांच्यावर १७ जानेवारीपासून शनीची दुसरी साडेसाती सुरू झाली असून १७ जानेवारीपासून १८ दिवसांत त्यांचे मोठं नुकसान झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. अदाणींचं आत्तापर्यंत सुमारे १५० अब्जांचे नुकसान झाले आहे. ज्योतिषशास्त्राच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तामध्ये राहूच्या दशातून जे लाभ मिळत होते, ते साडेसाती सुरू होताच संपले, शनीचे साडेसातीचे चक्र त्यांच्यावर अडीच वर्षे राहील, त्याचवेळी आरोही कुंडलीमध्ये अशुभ पापकर्तरी योगही तयार होतो, त्याचबरोबर राहूची शुक्र, अंतर आणि प्रत्यंतर दशाची महादशा सुरू असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळेही अदाणींना मोठा फटका बसला असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जूननंतर शुक्र-राहू-बुध दशात काहीसा दिलासा मिळू शकतो असा अंदाज आहे.

(हे ही वाचा: १५ फेब्रुवारीपासून गुरुच्या कृपेने ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? प्रमोशनसह मिळू शकतो अपार धनलाभ )

गौतम अदानींच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण!

दुसरीकडे, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबादमध्ये झाला आणि त्यांच्या जन्माची वेळ सकाळी ५ वाजून १५ मिनिटे होती. गौतम अदानींची लग्न रास वृषभ आहे. त्यांची जन्मकुंडली वृषभ आहे आणि धन आणि बुद्धीचा स्वामी त्यांच्या लग्न भावात बसलेला असल्याचं या वृत्तात नमूद केलं आहे.

गौतम अदानींच्या कुंडलीत दोन पंचमहापुरुष राजयोग!

यासोबतच दशम भावात गुरु आणि चंद्र यांच्या युतीचा शुभ मानला गेलेला गजकेसरी योग तयार होत आहे. याशिवाय गौतम अदानी यांच्या कुंडलीत कालसर्प योग तयार होत असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर धन आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रहाची स्थिती चालू आहे. त्याचवेळी राहूची आंतरिक स्थितीही चालू आहे. यामुळेच त्यांनी उंचीला स्पर्श करण्यास सुरुवात केल्याचा अंदाज आहे. आता दोन्ही ग्रह संक्रमण कुंडलीत तिसऱ्या घरात स्थित आहेत, जिथे ते मजबूत स्थितीत मानले जातात. दुसरीकडे, नवांश कुंडलीमध्ये कक्रंक्ष नावाचा राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे व्यक्तीला अपार संपत्ती मिळते. तर गुरू आणि बुध त्यांच्या स्वतःच्या राशीत आहेत. त्यामुळे दोन पंचमहापुरुष राजयोग झाले आहेत. त्यानुसार जीवनात अपार संपत्ती मिळेल, पण साडेसातीमध्ये त्यांनी काळजी घेण्याची विशेष गरज असल्याचा अंदाज ज्योतिषशास्त्राच्या हवाल्याने या वृत्तात नमूद करण्यात आला आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:26 IST
ताज्या बातम्या