Surya Transit : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा सूर्याचे गोचर खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्यदेव ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, म्हणजे महिन्यातून एकदा ते राशी बदलतात. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातही सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकते. १६ डिसेंबर रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करणार आहेत. दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनंतर सूर्य देव वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतील. सूर्यदेवाचा धनु राशीतील प्रवेश काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. तर त्या भाग्यावान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

धनु रास –

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन खूप शुभ ठरु शकते. सूर्यदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. या काळात तुम्ही कुटुंबीयांसह सहलीचे नियोजन करू शकता.

मिथुन रास –

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर लाभदायक ठरु शकते. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासाठी केलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकता.

हेही वाचा – पुढील ८ दिवस ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? बुध, सुर्य आणि मंगळाच्या कृपेने अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

मीन रास –

सूर्याच्या राशीतील बदल मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्ही व्यवसायासाठी केलेले प्रयत्न फळ देऊ शकतात. विवाहित लोकांच्या आयुष्य आनंदी राहू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)